महाराष्ट्राचं 'स्टेम सेल' तंत्र करोना महामारीला रोखणार का? काय आहे 'स्टेम सेल' तंत्र ?

Update: 2021-05-11 17:22 GMT

कोरोना महामारी कधी जाईल? असा प्रश्न जो तो विचारत आहे. कोणी तरी डॉक्टर, शास्त्रज्ञ यावर चांगला उपचार शोधेल. अशी आशा लोक लावून बसले आहेत. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हातात घेतलं आहे. अशातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप व्ही महाजन यांनी कोरोनाच्या विरोधात एक तंत्र विकसीत केलं असून कोरोनाच्या विरोधातील लढाईत हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

डॉ. प्रदीप महाजन यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 'स्टेम सेल' आधारित एक पद्धत विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन रुग्णाला रुग्णालयात भर्ती करण्याची शक्यता 65 ते 75 टक्के कमी होते.

नवी मुंबई चे यूरोलॉजिस्ट आणि रीजनरेटिव मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी या संदर्भात बोलताना सांगितले कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळं रुग्णांना अधिक वेळ आयसीयू मध्ये दाखल करावं लागतं. विशेष म्हणजे उपचार झाले तरी रुग्णांना अनेक दिवस ऑक्सिजनची गरज पडते. मात्र, या उपचार पद्धतीने चांगले परिणाम समोर आले आहेत.

स्टेमआरएक्स बायोसाइंसेज सॉल्यूशंस चे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितलं की, ब्लड बॅंक मधील किंवा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातून प्लेटलेट्स काढून एक पावडरचं औषधं तयार केलं जातं. या औषधाला नेबुलाइजर या रोटाहेलर च्या मदतीने थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचवलं जातं. सध्या कमी प्रमाणात औषधं तयार केलं जात असून त्यासाठी एक मशिन तयार केली आहे.

Tags:    

Similar News