भाजपचा लोकशाहीवर हल्ला : ममतांचे सर्व विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना पत्र

बिगर भाजपशासित राज्यामध्ये हस्तक्षेप करुन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपविरोधात आता एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकजूट व्हायचं आवाहन केलं आहे.

Update: 2022-03-29 09:36 GMT

ममता बॅनर्जींनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. त्यांनी या पत्रामध्ये भाजपच्या लोकशाहीवरील थेट हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भाजपविरोधात लढण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी कटाक्षाने सांगितलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रत्येकाच्या सोयीनुसार आणि योग्यतेनुसार एखाद्या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी विचारमंथन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे अशी मी विनंती करते, असं त्यांनी आवाहन केलं आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ट्विटरवर हे पत्र पोस्ट करण्यात आलंय.

Our Hon'ble Chairperson @MamataOfficial writes to all Opposition leaders & CMs, expressing her concern over @BJP4India's direct attacks on Democracy.

या पत्रात त्यांनी भाजप पक्षाच्या एकाधिकारशाहीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजपने आपल्या देशाच्या संघराज्य रचनेवर वारंवार हल्ला केला आहे. त्यामुळे आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.


Tags:    

Similar News