वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

Update: 2021-11-21 04:56 GMT



वर्धा : मोदी सरकारने तीनही कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय घेतला. या कायद्यांचा सुरूवातीपासूनच काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व समस्त काँग्रेस पक्षाने प्रखर विरोध केलेला आहे.त्यामुळे आज कायदे परत घेण्याचा निर्णय घेतल्यावर हा दिवस काँग्रेस पक्षाने शेतकरी सन्मान दिवस म्हणुन पुर्ण भारतभर पाळण्याचे ठरवले. वर्धा जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे हा दिवस शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून आज महात्मा गांधी पुतळा ते शहिद स्मारक कॅंडल मार्च काढून शेतकरी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गांधी चौकातून शहीद स्मारक पर्यंत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस वर्धा जिल्ह्याचे प्रभारी जिया पटेल यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.

यावेळी जिलाध्यक्ष मनोज चांदुरकर, ज्येष्ठ कांगे्रस नेता शिरीष गोडे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, प्रदेश सचिव चंद्रकांत काकडे, तहसील अध्यक्ष बालाभाऊ जगताप, विदर्भ प्रदेशाध्यक्ष महिला इंटक अर्चना भोमले, जिला महिला कांग्रेस की महासचिव सपना शेंडे, कांग्रेस की महिला शहराध्यक्ष अरुणा धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:    

Similar News