६ जिल्हा परिषदांसाठी शांततेत मतदान

Update: 2020-01-07 05:03 GMT

मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय त्या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगतोय.

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार, पालघर या ६ जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीये. यात नागपूर जिल्हा परिषद हातून जाऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीये.

हे ही वाचा...

जेएनयू अपडेट – गेटवे इथून आंदोलक विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलवलं

दिल्लीकरांचा कौल कोणाला? ८ फेब्रुवारीला मतदान

दिल्लीकरांचा कौल कोणाला? ८ फेब्रुवारीला मतदान

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर इथंही भाजपनं आपली ताकद पणाला लावलीये. या सहाही ठिकाणी सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झालीये. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 53 तर सातही पंचायत समित्यांमधील 106 गणांसाठी मतदान सुरू आहे.

तर पालघर जिल्हा परिषदेसह त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दहा लाख 44 हजार 88 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून न आल्याने भाजपपुढे मोठं आव्हान आहे.

Similar News