युवकांची दिशाभूल करतो म्हणणारे आता आमचं अनुकरण करत आहे, विनायक मेटेंचा संभाजीराजेंवर निशाणा...

Update: 2021-06-06 14:00 GMT

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं त्यांनी आज रायगडावर म्हटलं आहे. आज रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरातून पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं.

यावर आमदार विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले जे आम्हाला युवकाची दिशाभूल करतो म्हणाले होते, तेच लोक आता आमचं अनुकरण करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दिशाभूल कोण करतं हे जनता ठरवेल? कोण काय म्हणतं याला आम्ही महत्त्व देत नाही, अशी टीका विनायक मेटे यांनी संभाजीराजे यांच्यावर केली आहे.

Tags:    

Similar News