येवला येथे कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागातर्फे हा महोत्सव घेण्यात आला.

Update: 2021-08-13 08:03 GMT

येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागातर्फे हा महोत्सव घेण्यात आला. नागरिकांना सकस आहाराचे महत्व कळावे तसेच रानात पिकणाऱ्या भाज्यांची ओळख व्हावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रानभाज्यांमुळे शरीराला कोणता फायदा होतो, रानभाज्यांपासून मिळणारे जीवनसत्वामुळे शारीरिक क्षमता , शरीराचा काटकपणा आणि बुद्धीला मिळणारे तेज, रक्ताभिसरण प्रक्रिया आदींसाठी रानभाज्या कशा महत्वाच्या ठरतात याची माहिती या महोत्सवातून नागरिकांना मिळते.

निसर्गाने रानभाज्या दुर्मिळ ठिकाणी विशिष्ट वातावरणात येण्याची व्यवस्था केली असल्याने त्यांची ओळख व फायदे नागरिकांना व्हावे याकरता रानभाज्या महोत्सवात कृषी विभागातर्फे माहिती दिली जाते. दरम्यान या रानभाज्या महोत्सवाचा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी फायदा घेतला. यावेळी कृषी अधिकार्यांोसह , कृषी मंडल अधिकारी , कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींनी मार्गदर्शन केले.

Tags:    

Similar News