विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करा- प्रकाश आंबेडकर

Update: 2022-04-13 09:49 GMT

मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटकही झाली. या सर्व घटनांनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर अनुचित घटना घडू शकते याचे पत्र घटनेच्या चार दिवसा आधीच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. या पत्रात सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान मातोश्री बंगला आणि वर्षा हे शासकीय निवासस्थान , परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील निवास स्थान या ठिकाणी एस.टी. कर्मचारी करू शकतात असे नमूद केले होते. या सर्व बाबींची माहिती असताना सुद्धा पोलीस विभागाच्या चुकीने एवढी मोठी घटना घडली . या घटनेस जबाबदार असणारे सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची चौकशी करण्याऐवजी त्यांनाच सदर चौकशी समितीच्या प्रमुख पदी नियुक्त करणे ही बाब आक्षेपार्ह आहे. त्यामुळे घटनेस जबाबदार असलेले सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा एड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

राज ठाकरे यांची भूमिका ही दंगल घडविणारी जिथे जिथे मंदिर आहे त्या मंदिरांच्या वर भोंगे लावून हनुमान चाळीसा पठण केले त्याला काही हरकत नाही , परंतु मस्जिद समोर हनुमान चालीसा भोंगे लावून वाजविणे हे दंगल घडविण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका राज घेत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर आयपीसी 153 अन्वये कारवाई होऊ शकते. राज्य सरकार कारवाई का करीत नाही हे कळण्यापलीकडे आहे.असे मत प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत मांडले आहे.


Full View

Tags:    

Similar News