वर्षा राऊत यांनी ५५ लाख केले परत..ईडी कडून पुन्हा नोटीस पाठवणार?

प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांनी परत केले आहेत. कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बाजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचलले आहे.

Update: 2021-01-15 08:22 GMT

कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांनी परत केले आहेत. या व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत याना ईडीने समन्स बजावलं होत. त्यानंतर राऊत यांनी हे पैसे परत केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ईडी वर्षा राऊत यांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे.

पीएमसी बँकेला फसवून एचडीआयलनं मिळवलेले ९५ कोटी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यानं ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर टाकले होते. व त्यातील ५५ लाख हे वर्षा राऊत यांना दिले होते.

पीएमसी बँक व एचडीआयएल कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकानं नोव्हेंबर महिन्यात वर्षा राऊत यांना चार वेळा समन्स बजावले होते. परंतु त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. त्यांनी २९ डिसेंबर दिवशी उपस्थित राहण्यासाठी ईडीकडून वेळ मागितली होती. त्यानुसार त्या ५ जानेवारी रोजी हजर राहणार होत्या. परंतु एक दिवस आगोदरच त्या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. आता त्याना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News