वर्षा बंगल्यात उद्धव ठाकरें विरोधात लिखाण

Update: 2019-12-28 09:51 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र नेहमीच 'वर्षा' बंगला राहिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री नेहमीच इथुन राजकारणाची सुत्र हलवत असतात म्हणुनच हा बंगला चर्चेत असतो. मात्र, यावेळी वर्षा बंगला एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी चं (MahaVikasAaghadi) सरकार स्थापन झालं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) झाले आहेत. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. सत्तापालट झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘वर्षा’ बंगला (Varsha Bungalow) सोडावा लागला. या बंगल्यावर आता उद्धव ठाकरे जाणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे जाण्याअगोदर वर्षा बंगल्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादविवाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्य लिहलं गेल्याचं समोर आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर सध्या हा बंगला सार्वजनिक विभागाकडे आहे. उद्धव ठाकरे लवकरच या बंगल्यावर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्याकरता गेले होते. मात्र, यावेळी एक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारी वाक्य आढळून आली. त्यामुळे या प्रकारावरुन भाजप-शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय लिहले आहे भिंतीवर?

‘हु इज यू टी? यू टी इज मीन यू टी वाईट आहेत. शट अप’, अशाप्रकारची विधानं भिंतीवर लिहण्यात आली आहेत.

Similar News