मतदानाच्या दिवशी शबाब, कबाब आणि पैसे या पासून दूर राहून मतदान करा- आंबेडकर

Update: 2021-11-14 03:03 GMT

अकोला // आरएसएस -भाजपव्यतिरिक्तही अनेक राजकीय पक्ष हिंदूंचे असून, त्या पक्षांत हिंदू आहेत. आरएसएस-भाजप वगळता अन्य काेणत्याही पक्षाला मतदान करा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते ओबीसी महासंघाच्यावतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात बाेलत हाेते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांच्या हातात तलवार देवून त्यांना त्याकाळात व्यवस्थेत सहभागी करून घेतले. मात्र, त्यानंतर ओबीसींचा केवळ वापर करण्यात आला. आता तर थेट संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका, असं आंबेडकर म्हणाले.

सोबतच मतदानाच्या दिवशी शबाब, कबाब आणि पैसे या पासून दूर राहून मतदान करा, कारण मतदान झालं की, कुणी शबाब देणार नाही. देशाचा स्वतंत्र दिवस हा काळा दिवस म्हणून संघाने पाळला. तर पाकिस्तानचा स्वतंत्र दिन हा साजरा केला असा घणाघात आंबेडकर यांनी केला. ओबीसी मेळाव्याला अकोला जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

Tags:    

Similar News