रशियाने केली अँटी मिसाइल टेस्ट? अमेरिका रशियामध्ये Space War...

अमेरिका आणि रशियामध्ये Space War? काय घडतंय अंतराळात? स्पेस वॉर म्हणजे काय? anti-satellite missile test म्हणजे काय? युद्धाचं नव तंत्र जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2021-11-17 07:56 GMT

अंतराळात रशियाने आपलाच उपग्रह (सॅटेलाईट) क्षेपणास्त्राच्या मदतीने नष्ट केल्याचं बोललं जात आहे. रशियाने ही Antisatellite test (अँटी सॅटेलाइट टेस्ट) केली असल्याचं बोललं जात आहे.

या घटनेनंतर रशिया आणि अमेरिकेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. रशियाने स्वतःचा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ठ केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यामुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) International Space Station | NASA च्या क्रू मेंबर्सना धोका निर्माण झाला आहे.

लोअर ऑरबिट मध्ये 5 देशाचं ISS नावाचं एक स्पेस स्टेशन आहे. या देशांमध्ये रशिया, अमेरिका, जपान, युरोप, कॅनडा या देशांचा समावेश आहे.

दरम्यान रशियाने केलेल्या या Ant satellite test ने अंतराळ परिसरात उपग्रहाचे तुकडे पसरल्याचे अमेरिकेने म्हणणं आहे. या तुकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्टेशनवर काम करत असलेल्या ISS स्टेशनवरील सात क्रू मेंबर्सना कॅप्सूलमध्ये जावे लागले. त्यामुळे त्यांच्या कामाला मोठा फटका बसला असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

रशियाचे वर्तन बेजबाबदार...

रशियाने केलेल्या या Anti satellite test मुळं अमेरिका ( United states) सरकार आणि नासाने संताप व्यक्त केला आहेत. रशियाचे हे पाऊल धोकादायक आणि बेजबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ते बऱ्याच काळापासून रशियाच्या अंतराळ हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.

पृथ्वीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने अंतराळात आपल्या लक्ष्यावर आदळल्याची घटना आत्तापर्यंत केवळ चार वेळा घडली आहे. नासाचे म्हणणे आहे की, रशियाच्या या निर्णयामुळे अंतराळात नवीन शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू होण्याची भीती आहे.

लेझर शस्त्रांचा धोकाही वाढेल...

रशियाच्या या कृतीमुळे अंतराळात केवळ शस्त्रास्त्रांची शर्यतच सुरू होणार नाही, तर अवकाशात लेझर शस्त्रांचा धोकाही वाढेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाचे हे पाऊल अमेरिकन सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले आहे. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर हे बेजबाबदार कृत्य असल्याचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हंटल आहे. उपग्रहाचे सुमारे 1500 तुकडे कक्षेत तरंगत आहेत आणि यामुळे ISS ला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा करत असल्याचं देखील त्यांनी म्हंटले आहे.

Anti satellite test कशासाठी?

युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रू राष्ट्राची कम्युनिकेशन यंत्रणा बंद करण्यासाठी शत्रू राष्ट्राच्या उपग्रहावर हल्ला केला जातो. त्यामुळं त्या राष्ट्राची कम्युनिकेशन यंत्रणा ठप्प पडते.

Tags:    

Similar News