डोनाल्ड ट्रम्प यांना का व्हावे लागले अंडरग्राउंड?

Update: 2020-06-02 00:47 GMT

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेतील 40 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. सोमवारी तर हे आंदोलन एवढे तीव्र झाले की संतप्त आंदोलका़नी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसवर धडक दिली.

संतप्त जमाव पाहून सुरक्षा रक्षकांनी अध्यक्ष ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमधील सुरक्षा बंकरमध्ये नेले. त्या ठिकाणी ट्रम्प यांना काही मिनिटे थांबून रहावे लागले.

हे ही वाचा...


राज्याला चक्रीवादळाचा इशारा, एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, या 14 पिकाचं समर्थन मूल्य वाढवलं...

श्रमिक ट्रेनचे सर्व पैसे भरल्याचा सरकारचा दावा खोटा- देवेंद्र फडणवीस

हिंसाचार आणि तीव्र आंदोलनामुळे वॉशिंग्टनसह ४० शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात जॉर्ज फ्लॉइड या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यावेळी त्याचे हात बांधून ठेवत एका पोलिसाने त्याची मान पायाने दाबून ठेवल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून कारवाईची मागणी करु लागले आहेत.

दरम्यान अमेरिकेतल्या रस्त्यांवर जे सुरू आहे ते स्वीकारार्ह नाही आणि हिंसाचार, लूट सहन केली जाणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्याचबरोबर हिंसाचार थांबला नाही तर लष्करला रस्त्यावर उतरवावे लागेल असाही इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

Similar News