उत्तर प्रदेशातील कामगारांचा महाराष्ट्रात छळ, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

Update: 2020-05-24 18:37 GMT

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापताना दिसतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

ज्या मजुरांनी आपल्या घामाने महाराष्ट्राला घडवलं त्या मजुरांचा महाराष्ट्र सरकारने छळ केला, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केलाय. योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या ट्विटरवरून याविषयीचं ट्विट करण्यात आलंय.महाराष्ट्र सरकारने कामगारांना धोका दिला आणि त्यांना घरी जाण्यासाठी परावृत्त केलं. या अमानवीय व्यवहारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानवता कधी माफ करणार नाही असं आदित्यनाथ म्हणालेत.

कामगार उत्तरप्रदेशात परतल्यानंतर त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. आपली कर्मभूमी सोडायला लावल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कामगारांची चिंता असल्याचं नाटक करू नये. आम्ही त्यांची काळजी घेऊ. शिवसेना आणि काँग्रेसने याबाबत आश्वस्त राहावं असंही त्यांनी पुढे म्हटलंय.

Similar News