उन्नाव प्रकरण : या आहेत 10 महत्त्वाच्या बाबी

Update: 2019-08-02 04:01 GMT

ऊन्नाव मधील पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबाशी संबंधीत पाचही खटले दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच पीडितेच्या कुटूंबाचा ट्रक-कार दुर्घटनेत झालेल्या मृत्यूचा तपास सात दिवसात करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआई) वर सोपवली आहे. दरम्यान पीडित तरुणी रुग्णालयात आपल्या जीवनाची लढाई लढत असताना न्यायालयाने पीडित तरुणीला आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच पीडित तरुणी आणि तिच्या कुटूंबाच्या संरक्षणासाठी सुरक्षा पुरवण्याचे आदेश देखील न्यायालयाने यावेळी दिले आहेत. पिडीत तरुणीने न्यायालयाकडे सुरक्षा प्रदान करण्याचे मागणीचे पत्र पाठवले होते. परंतु हे पत्र वेळेवर न पोहोचल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी जोडल्या गेलेल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

1. सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणाशी सबंधित पाच ही खटले सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले. तसंच या प्रकरणाची सुनवाई दररोज नियमितपणे करण्याचा आदेश दिला आहे.

2. त्याच बरोबरीने सर्वोच्च न्यायालयाने पीडित तरुणी ला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच ही नुकसान भरपाई युपी सरकारव्दारे (योगी सरकार) केली जाईल. येत्या 45 दिवसांमध्ये या खटल्याची सुनवाई पूर्ण करण्याचा आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

3. पीडित तरुणीसह तिच्या कुटुंबाची आणि तिच्या वकीलाच्या सुरक्षतेची जबाबदारी सीआरपीएफला देण्यात आली आहे. रविवारी पीडितेच्या कार ला एका ट्रकने धडक मारली. या दुर्घटनेची शिकार झालेली पीडित तरुणी आणि तिच्या वकीलावर लखनऊच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.

4. उन्नाव सामुहीक बलात्कार प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांना प्रश्न केला की, तुम्हाला किती वेळ हवा आहे. (बलात्कार पिडीत तरुणीच्या ट्रक-कार दुर्घटने बाबत तपासणी करण्यासाठी.) यावर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले, ’एक महिना’ यावर गोगाई म्हणाले, ‘एक महीना ? नाही, सात दिवसात करा’.

5. उन्नाव सामुहीक बलात्कार प्रकरणाचा मुख्य आरोपी आमदार कुलदिप सिंघ सेंगर याची भाजप ने हकालपट्टी केली आहे.

6. रायबरेली मध्ये झालेल्या ट्रक आणि कार दुर्घटनेवेळी उन्नाव बलात्कार पिडीतेच्या सुरक्षतेसाठी नेमलेल्या पोलिसांपैकी 3 पोलिसांनी ड्युटी वर असताना दुर्लक्ष केल्याने, त्यांना सस्पेंड करण्यात आले आहे.

7. सीबीआई ने उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या ट्रक-कार दुर्घटने बाबत भाजपा आमदार कुलदिप सिंह सेंगर आणि इतर नऊ लोकांवर, हत्त्येच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली.

8. रविवारी बलात्कार पीडितेच्या कारला ट्रकने धडक मारली होती. या दरम्यान कारमध्ये असलेल्या दोन महीलांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तसंच बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहेत.

9. दिल्ली महीला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी उत्तर प्रदेश च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची बुधवारी भेट घेऊन उन्नाव बलात्कार पीडितेच्या उपचारासाठी हवाई मार्गाने दिल्लीला नेण्याची मागणी केली.

10. रायबरेली रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेली उन्नाव बलात्कार पीडित तरुणी व तिच्या वकीलांची आजही म्हणजे दुर्घनेच्या पाचव्या दिवशीही प्रकृती नाजूक अर्थात जशी-च्या-तशी होती. पीडित तरुणीला अजुनही व्हेंटीलेटर ठेवले असुन वकीलाला थोडा वेळ व्हेंटीलेटरवरुन बाजुला ठेवून पाहण्यात आले. किंग जॉर्ज मेडीकल युनिव्हर्सिटी ने पीडितेच्या उत्तम उपचारासाठी एअर लिफ्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मेडीकल युनिव्हर्सिटीने या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.

Similar News