उजनी धरण 100 टक्के भरलं ; 42 वर्षांच्या इतिहासात धरण भरण्याची 37 वी वेळ

Update: 2021-10-06 01:49 GMT

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण काल मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास १०० टक्के भरले, सध्या धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झाला आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत धरणात १११.५९ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणी साठा होणे अपेक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही मोठ्या क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही, परंतु दौंड येथून लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्क्याची पातळी गाठली आहे. धरण मागील ४२ वर्षांत १०० टक्के भरण्याची ही ३७ वी वेळ आहे.

उजनी धरणावरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरून 'ओव्हरफ्लो' झालेली आहेत, ४ ऑक्टोबरपासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नद्यांना पूर आलेले आहेत. हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. 

Tags:    

Similar News