उदयनराजे आणि मोदी एकाच मंचावर

Update: 2019-09-19 17:55 GMT

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी नुकताच राष्ट्रवादीचा खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात सहभागी झालेले छत्रपती उदयनराजे भोसले सध्या निवडणुकाच्या केंद्र स्थानी आहेत. दिल्ली येथे भाजप च्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत उदयनराजे यांचा पक्ष प्रवेश झाला. सातारा येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने मिरवणूक झाली. या सर्व वातावरणात उदयनराजे यांना भाजप पक्षात मानाचे स्थान मिळाले असं चित्र निर्माण झाले होतं.

मात्र, आज नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत मोदींच्या उपस्थितीत त्यांचं स्थान नेमकं काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष प्रवेशावेळी केलेलं वक्तव्य आणि आजच्या सभेतील उदयनराजे यांचं स्थान या संदर्भात काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.... पाहा हा व्हिडीओ

Full View

Similar News