ट्वीटर विरोधात अखेर पहिला गुन्हा दाखल...

Update: 2021-06-16 09:09 GMT

सोशल मीडियावर Active असणाऱ्यांसाठी आणि वेब सिरिज पाहणाऱ्यांची संख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ही बाब लक्षात घेता भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा दाखला देत 25 फेब्रुवारीला सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात काही नवीन दिशा निर्देश जारी केले होते. त्याची मुदत 25 मेला संपली. तरीही सरकारने सोशल मीडियावरील माध्यमांना नोटीस पाठवून भारत सरकारच्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. ट्वीटरने या नियमांची अंलबजावणी केली नाही म्हणून आज ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्या नियमानुसार झाला गुन्हा दाखल?

25 मे नंतर हे ज्या सोशल मीडियाचे फ्लॅटफॉर्मचे युजर 50 लाखांपेक्षा अधिक आहेत. त्यांना हे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता ज्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मने हे नियम पाळले नसतील तर युजरच्या पोस्टसाठी संबंधीत सोशल मीडिया कंपन्यांना जबाबदार धरलं जाईल. या अगोदर Information And Technology act च्या 79 नुसार या कंपन्या कोणत्याही यूजरच्या पोस्टला जबाबदार नव्हत्या. मात्र, नवीन कायद्यानुसार आता कंपन्या जबाबदार असतील.

ट्वीटरवर पहिला गुन्हा दाखल...

नवीन नियमानुसार ट्विटरने भारत सरकारचे नियम न पाळल्याने ट्विटर विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावर प्रशासनाने बनावट व्हिडीओचा वापर करत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून ट्वीटरसह 9 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत नवे नियम?

आक्षेपार्ह मजकुर हटवण्यासाठी भारतात तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती बंधनकारक

महिलांची चारित्र्य हननाची तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी.

सोशल मीडियावरील अश्लीलतेला आळा घालण्यात यावा

सोशल मीडिया यूजरसाठी कंपन्यांनी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी

महिलाविरोधी पोस्ट 24 तासांत हटवाव्या लागतील

सोशल मीडियावर काही समाजविघातक घडत असेल ते हटवावे.

एखाद्या कटेंनचा फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे? याची माहिती देणं बंधनकारक असेल...

भारतातील सोशल मीडिया युजर...

व्हॉट्सअॅप 53 कोटी वापरकर्ते

युट्यूब 43 कोटी

फेसबुक 41 कोटी

इन्स्टाग्राम 21 कोटी

ट्विटर 1.7 कोटी.

Tags:    

Similar News