ट्रम्प यांना ट्विटरचा दणका, कायमस्वरुपी बंदी

Update: 2021-01-09 08:00 GMT

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने दणका दिला आहे. अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्यावर ट्विटरने बंदी घातली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी @POTUS या अध्यक्षांच्या अधिकृत पोस्टवरुन ट्विट केले पण ट्विटरने ते ट्विट तातडीने डिलीट केले. यानंतर ट्विटरने @Teamtrump and @realtrump हे अकाऊंटही बंद केले आहेत.

या अकाऊंटवरुन "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे आणि ट्विटर डावे आणि डेमोक्रॅट्सला मदत करत आहे" असा आरोप करणारे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ही अकाऊंट्ससुद्धा बंद करण्यात आली. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली होती तसेच भविष्यात आपण स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उभा करु अशी घोषणाही केली होती.



 


Tags:    

Similar News