प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनाने निधन

Update: 2021-04-30 08:18 GMT

प्रसिद्ध न्यूज अँकर आणि पत्रकार रोहित सरदाना यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. रोहित सरदाना हे झी न्यूज चॅनलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी अँकर सुधीर चौधरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

काय म्हटलंय ट्वीट मध्ये ?

सुधीर चौधरी यांनी म्हटले की, 'थोड्या वेळपूर्वीच जितेंद्र शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जे म्हटले ते ऐकून हात थरथरत आहेत. आमचे मित्र आणि सहयोगी रोहित सरदाना यांच्या मृत्यूचे वृत्त होते. हा व्हायरस आपल्या किती जवळच्यांना घेऊन जाणार आहे याची कल्पना केली जाऊ शकत नाही. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवाने केलेला अन्याय आहे...!ॐ शान्ति.'

दरम्यान,

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही रोहित सरदाना यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले, 'मित्रांनो, ही अत्यंत वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना.

असं राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Tags:    

Similar News