तुकाराम मुंढेंचं मिशन वॉच, रुग्णांची लुटमार थांबवणार का?

Update: 2020-08-04 05:40 GMT

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवणं बंधनकारक आहे. खासगी हॉस्पिटल कोरोनाच्या रुग्णांची लुट करत असल्याच्या बातम्या तुम्ही माध्यमांवर पाहिल्याच असतील. नागपूर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खासगी हॉस्पिटल कडून रुग्णांची लूट होऊ नये. यावर जालीम उपाय म्हणून नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट विशेष पथकाची नेमणूक केली आहे. व

आता हे पथक महापालिकेने खासगी हॉस्पिटल संदर्भात केलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही... यावर वॉच ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या खास पथकाची नेमणूक केली असल्यामुळं आता खासगी हॉस्पिटल देखील रुग्णांची लूट करताना विचार करतील हे खरे... विशेष बाब म्हणजे मुंढे यांनी नागपूरमध्ये जी रुग्णालयं अतिरिक्त शुल्क आकारतील त्यांची थेट तक्रार करा. असं आवाहन नागरिकांना केलं आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल अतिरिक्त शुल्क आकारताना निश्चितच विचार करतील. हे तितकंच खरं...

विशेष बाब म्हणजे हे पथक कधीही या रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. आणि या पाहिणीत नियमांचा भंग करणारं काही आढळले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत...

Similar News