TRP SCAM : अर्णब गोस्वामीला मोठा धक्का

Update: 2021-03-24 06:53 GMT

TRP घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कुणाच्या अटकेची गरज भासली तर त्याची माहिती ३ दिवस आधी संबंधितांना द्यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. हे तीन दिवस सर्व प्रकारच्या सुट्या वगळता असले पाहिजेत असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. अर्णबच्या वकिलांना ७ दिवसांच्या पूर्वसूचनेची मागणी केली होती, पण कोर्टाने तीन दिवसांची मुदत दिली आहे. TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका रिपब्लिक टीव्हीने दाखल केली आहे. या याचिकेरील सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी TRP घोटाळाप्रकरणी रिपल्बिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांवर पौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणाचा तपास येत्या ३ महिन्यात पूर्ण केला जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. दरम्यान याप्रकरणाच्या आधीच्या सुनावणीमध्ये कोर्टाने पोलिसांना फटकारत अर्णबचे किंवा रिपब्लिकचे नाव आऱोपपत्रात का नाहीत, तीन महिने काय तपास केला असे विचारले होते. यावेळी रिपब्लिक टीव्हीतर्फे वकिलांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगितीचे आदेश द्यावे अशी विनंती कोर्टाला केली. पण तपास थांबवण्याची गरज नाही कारण यामध्ये नेमके कोण गुन्हेगार आहेत आणि कोण गुन्हेगार नाही हे स्पष्टच झालेले नाही, असे म्हणत तपासाला स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली.

Tags:    

Similar News