गेल्या काही दिवसापासून भुजबळ सेनेत जाणार का? या विषयी राजकीय चर्चा होत आहे. छगन भुजबळ शिवसेनेत जाणार की राहणार? याचा निर्णय अजुनही झाला नसला तरी छगन भुजबळ यांच्या जीवनातील सुवर्ण दिवस आज उजाडल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
छगन भुजबळांचे तुरूंगातून संपादकांना पत्र
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याचा आनंद – छगन भुजबळ
येवला लासलगाव मतदारसंघात २००४ साली प्रतिनिधित्व केल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत असून आज माझ्या आयुष्यातील हा एक सुवर्ण दिवस असल्याच्या भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केली. त्यांच्या हस्ते आज दरसवाडी धरण येथील कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित करण्यात आले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
हे ही वाचा
समता मेळाव्यातून सरकार विरुद्ध माजी मंत्री छगन भुजबळांचा ‘एल्गार’
तुरुंगात माझा जीव गेला असता – छगन भुजबळ
यावेळी भुजबळ म्हणाले की, गेल्या ४४ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कालव्याला पाण्याची प्रतीक्षा होती. यासाठी मांजरपाड्याचा प्रकल्प साकार करून पुणेगाव कालव्यातून पाणी दरसवाडी धरणात आले आणि आज या कालव्यातून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित झाले. माझ्या आयुष्यातील जे काही सुवर्ण क्षण आले. त्यातील आजचा हा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे. येवला लासलगाव मतदार संघात निवडून आल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिले आज अखेर पूर्ण झालं असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस – सद्यस्थिती आणि भवितव्य : भाग-१
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस – सद्यस्थिती आणि भवितव्य : भाग-२