काळे कायदे कधी रद्द होणार? तारीख पे तारीख म्हणत शेतकऱ्यांची आत्महत्या...

Update: 2021-02-07 08:29 GMT

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे परत घेतले जावेत. या मागणीसाठी शेतकऱ्यांचं 73 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर उपोषण सुरु आहे. मात्र, केंद्र सरकार हे कायदे परत घेण्यास तयार नाही. शेतकरी नेत्यांच्या आणि सरकारच्या या संदर्भात अनेक बैठका झाल्या पण अद्यापपर्यंत कायदे रद्द करण्यात आले नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

टिकरी बॉर्डर वर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह सिंगवाल जींद (52) असं असून शेतकऱ्याने आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत या शेतकऱ्याने भारतीय किसान यूनियन जिंदाबाद.

प्रिय शेतकरी बंधूनो,

हे मोदी सरकार फक्त तारखा सांगत आहे. याचा काहीच अंदाज नाही. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील. जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही.

धन्यवाद... असं म्हटलं आहे.

Tags:    

Similar News