JNUमध्ये झालेल्या घटनेमागे कुलगुरुंचा हात – सुष्मिता देव

Update: 2020-01-13 04:22 GMT

JNU मध्ये ५ जानेवारीला विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे विद्यापीठाच्या कुलगुरुंचा हात असल्याचा आरोप JNU हल्ला प्रकरणातील तथ्यांचा शोध घेणाऱ्या समितीने केला आहे. त्यामुळे तातडीने कुलगुरुंच निलंबन करुन चौकशी करण्याची मागणी या समितीने केली आहे.

झालेल्या घटनेचा तपास करुन स्वतंत्र चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या जात आहेत. JNU मध्ये झालेला हिंसाचार सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप समितीच्या सदस्या सुष्मिता देव यांनी केला आहे. कुलगुरुंचे तातडीने निलबंन करावे आणि प्राध्यापकांच्या सर्व नियुक्त्यांचा तपास करावा.

झालेल्या घटनेच्या चौकशीसाठी काँग्रेसने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. “जेव्हा पासून कुलगुरु जगदीश कुमार याची कुलगुरुपदी निवड करण्यात आली तेव्हापासून विद्यापीठात क्षमता नसलेल्या प्राध्यपकांची नियुक्ती करण्यात आली असून कुलगुरुंच्या मतानूसार वागणाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी घडवून आणलेला हल्ला आहे.” आणि जे विद्यार्थी उजव्या विचारसरणीचे नव्हते त्यांच्यावर हा हल्ला झाल्याच सुष्मिता देव यांनी स्पष्ट केलं.

Similar News