वाहतूक पोलिसांची चौकीच ठरत आहे वाहतुकीला अडथळा

Update: 2021-10-24 13:33 GMT

रस्त्याच्या मधोमध वाहतूक पोलिसांची चौकी कोलमडली असून 20 दिवस उलटूनही वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चौका-चौकात वाहतूक नियंत्रण चौकी उभारले आहे, मात्र कल्याण पूर्वेतील नाईंटी फूट रोडवर असलेले वाहतूक नियंत्रण चौकी 20 दिवस अगोदर चौकात उलटून पडल्याने ही चौकी वाहतूकीसाठी अडथळा ठरत असून अपघाताला आमंत्रण देत आहे. या रस्त्यावर रात्री जात असताना रस्ता अनेक वाहनचालकाचा या ठिकाणी अपघात होत आहे. याठिकाणी मोठा अपघात घडू नये यासाठी या परिसरातच असलेल्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष समशेर खान यांनी वाहतूक पोलिसांना रस्त्यावर पडलेली ही चौकी उपयोगात असेल तर उभी करावी अन्यथा ती त्या जागेवरून उचलावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. मात्र तरीही पोलिस यंत्रणा लक्ष देत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News