लॉकडाऊनबाबतच्या ‘त्या’ अधिसूचनांचं सत्य काय?

Update: 2020-05-28 05:42 GMT

लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता पुढच्या तीन दिवसात संपणार आहे. पण त्याआधी सध्या सोशल मीडियावर सरकारी अधिसूचना व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना मॉर्निंग वॉक, रनिंग, सायकलिंग तसंच गार्डन, खेळाची मैदानं अशा सार्वजनिक ठिकाणी व्यायाम करण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सुधारणा करुन 28 मेपासून सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत परवानगी दिली गेल्याचे म्हटले आहे.

तर आणखी एका व्हायरल नोटिफिकेशननुसार रेड झोनमधील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता इतर दुकानांपैकी 33 टक्के दुकानं टप्प्या टप्प्याने उघडण्यास 29 मेपासून परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतरही दुकानांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले आहे.

पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना खोट्या असून सरकारने त्या जारी केलेल्या नाहीत, असे स्पष्ट कऱण्यात आले आहे. याचा अर्थ लॉकडाऊनबाबत सरकारने याआधी जारी केलेले निर्बंध तसेच असून त्यात अजून कोणताही बदल झालेला नाही.

Similar News