MVA Political : जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. जागा वाटपावाबाबत लवकरच निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात येणार आहे.

Update: 2023-06-02 08:47 GMT

महाविकास आघाडी लोकसभा निवडन निवडणूकीची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र जागा वाटपाचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समान जागा वाटप करण्याचा प्रस्थाव ठेवण्यात आला आहे. तर ठाकरे गटाने १८ जागांवर दावा केला आहे. यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

दोन दिवसात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील ४८ जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्री या उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने जिल्हा, तालुका बुथ पातळीचा आढावा घेण्यात येणार आहे. निवडणुक कशा जिंकता येतील? विरोधकांची काय रणनिती असणार यावर आघाडीत जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्यांना मदत केली जाईल. भाजपचा पराभव हा मविआचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर कोणतीही बिघाडी होणार नासल्याचं नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान कालच्या मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर पटोले यांनी प्रतिक्रीया दिली आहे ते म्हणाले "काँग्रेस त्याकडे लक्ष देत नाही, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. काँग्रेसची एक भूमिका आहे, राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी या सारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत असं पटोले यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News