महाराष्ट्राची सत्ता देश बुडव्यांच्या हाती - संजय राऊत

Update: 2023-07-09 07:01 GMT

सध्या देशात चालू असलेल्या राजकारणाव खासदार संजय राऊत यांनी खळळजनक टीका केली आहे. त्यांनी सरळ महाराष्ट्रातील राजकारण्यासोबत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर सुध्दा निशाना साधला आहे. ते म्हणाले की "प्रधानमंत्री यांनी भोपाळ मधील त्यांच्या पक्षाच्या संमेलनामध्ये जोरदार तोफ डागली. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नरेद्र मोदी यांनी राष्ट्रवादी वर केला होता. देश बुडवणारे म्हणजे भ्रष्टाचारी आर्थिक गुन्हेगार असं प्रधानमंत्री यांना म्हणायचं असेल. ज्यांनी देशाच्या बँका बुडविल्या आहेत, सहकारी साखर कारखान्यातून जनतेचा पैसा लुटलेला आहे, ज्याने इतर मार्गाने सरकारला चुना लावलेला आहे, हे आता सरकारमध्ये सामील झाले. परंतु यातील काही देश बुडवे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले आणि महाराष्ट्रात त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. मग या देश बुडव्यांचा काय करायचं? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणालेत "महाराष्ट्रातील सत्ता ही देश बुडव्यांच्या हाती गेलेली आहे. पण प्रधानमंत्री कारवाई करणार नाही, त्यांचे राज्यातले नेते या देश बुडव्यांची पूजा करत आहेत. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा कुणी काढला प्रधानमंत्री बोलले होते.

एनसीपी ने 70 हजाराचा सिंचन घोटाळा केला, हसन मुश्रीफ यांनी साखर कारखाना घोटाळा केला, छगन भुजबळ यांनी 500 कोटींचा घोटाळा केला. हे आम्ही म्हणत नाही भाजप म्हणतं असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांच्या चौकशांचं काय झालं? त्यांच्या चौकशी थांबविल्या असल्या, तर देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगावं की, ते आमच्या पक्षात आले म्हणून त्यांच्या चौकशी थांबविल्या असल्या, तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जनतेसमोर येऊन सांगावं की सगळे आमच्या पक्षात आल्यामुळे आम्ही त्यांच्या चौकशी थांबविल्या आहेत. त्यांना अभय दिलेलं आहे देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहे. हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांना तुम्हीच देश बुडवे म्हटलं होतं. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Full View

Tags:    

Similar News