विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे - नाना पटोले

Update: 2023-07-17 10:46 GMT

आज पावसाळी अधिवेशनची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी अनेक मुद्यांवर सराकारची कोंडी केली. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी शिंदे- फडणवीस-पवार यांच्या त्रिशुळ सरकारवर टीका केली आहे. ते म्हणालेत की "महाराष्ट्र सरकार लुटारू सरकार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्षांना शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिले नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली पण अजून मदत मिळालेली नाही, जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली असून, काँग्रेस ही जबाबदारी पार पाडत सरकारला जाब विचारत राहिल, सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करु. महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजपा सरकारने करत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. 

Full View

Tags:    

Similar News