लसीकरणाच्या टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आता रात्रीचे लसीकरण मोहीम सुरू

Update: 2021-11-17 11:20 GMT

नंदुरबार // जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या टक्का कमी असल्याने जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी आरोग्य प्रशासनाने आता रात्रीचे लसीकरण मोहीम सुरू केले आहे. या मोहिमेला मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या प्रतिसाद दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये अनावस्था दिसून येत होती. लसीकरणाच्या वेळेस ग्रामीण भागातील लोक मजुरीसाठी बाहेर जात असल्याने लसीकरणापासून ते वंचित राहत होते. त्यामुळे हर घर दस्तक या मोहिमेअंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनाने लसीकरणासाठी रात्रीची वेळ निवडली आहे. या अंतर्गत रात्रीचे दहा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपलब्ध राहत असून सर्व नागरिकांना लसीकरण करता येत आहे. ही मोहीम 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी दिली.आरोग्य प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्का वाढण्यासाठी मोठी मदत होईल.

Tags:    

Similar News