अमित शहा प्रवरा दौऱ्यावर, राधाकृष्ण विखेंचं भाजपमध्ये वजन वाढणार?

Update: 2021-12-13 03:36 GMT

अहमदनगर // सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत अर्थात अहमदनगर जिल्ह्यात देशाचे पहिले सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह शनिवार (दि. १८ डिसेंबर) येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवरानगर येथे राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे, याबाबत भाजपाचे नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माहिती दिली. पहिले सहकार मंत्री झाल्‍यानंतर शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती, त्यानुसार ते येत असल्याचेही विखे यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात शहा पुण्यात येणार होते. त्यावेळी त्यांचा अहमदनगर जिल्ह्यातही दौरा होणार होता. मात्र, तो अचानक रद्द झाला. आता १८ डिसेंबरला ते अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्‍थापना केली. मंत्री अमित शाह यांच्‍याकडे या विभागाचा कार्यभार देण्‍यात आला. सहकार चळवळीच्‍या दृष्‍टीने ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. सहकार मंत्री झाल्‍यानंतर शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. त्यानुसार ते येत प्रवरा परिसरात येत आहेत.

दरम्यान अमित शहा यांच्या अहमदनगर दौऱ्याने काॅंग्रेस सोडून भाजप मध्ये आलेल्या विखे पाटलांचं भाजप मध्ये वजन वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Tags:    

Similar News