दहशतवादी बुरहान वानीच्या वडिलांनी शाळेत फडकवला तिरंगा...

Update: 2021-08-15 10:58 GMT

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या वडिलांनी स्वातंत्र्यदिनी जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शाळेत राष्ट्रध्वज फडकावला आहे. बुरहानच्या वडिलांचा तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जुलै 2016 मध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वानी हा ठार झाला होता. बुरहानचे वडील हे शिक्षक आहेत.

त्यांनी आज त्राल येथील शासकीय कन्या उच्च माध्यमिक शाळेत राष्ट्रध्वज फडकवला, संपूर्ण देश स्वातंत्र्याचा 'अमृत महोत्सव' साजरा करत असून केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने शिक्षकांसह सर्व विभागांना स्वातंत्र्यदिनी सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीच्या एन्काउंटर नंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. खोऱ्यांमध्ये तीव्र आंदोलन झाली. या दरम्यान सुमारे 30 लोकांचा मृत्यू झाला.



बुरहान वानी केव्हा मारला गेला ? 8 जुलै 2016 रोजी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान वानी ठार झाला. बुरहानच्या मृत्यूनंतर खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शनं करण्यात आली. तर चार महिन्यांहून अधिक काळ आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरूचंहोता. हिजबुलचा 'पोस्टर बॉय' बुरहान वानी दक्षिण काश्मीरमधील त्रालच्या एका चांगल्या कुटुंबातून होता. तसेच तो जिथे मारला गेला तिथून त्याचं घर फार दूर नाही. बुरहान वानी हा वयाच्या 15 व्या वर्षीच हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला होता. दरम्यान, सुरक्षा दलांनी बुरहान वानीवर 10 लाखांच बक्षीस जाहीर केलं होतं.
Tags:    

Similar News