राज्यातील शाळा सुरू करण्याआधी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Update: 2021-09-02 08:43 GMT

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्सशी बोलून घेणार आहेत. पण तोपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यांत शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आहेत. दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News