तमाशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तमाशा या कलेतून केवळ मनोरंजन नव्हे तर प्रबोधन देखील केले जात असे. महाराष्ट्रात आज शेकडो तमाशा कलाकार आहेत. त्यांच्या आज अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या सहन करून या कलाकारांनी आपली कला जगवली आहे. आजच्या काळात तमाशा कलावंतांच्या समस्या काय आहेत? आजच्या काळात या कलेसमोर काय आव्हानं आहेत? यासंदर्भात ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्याशी बातचीत केली आहे… आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी....