आरोग्य विभागाची रिक्त पदे लवकरच भरणार : आरोग्यमंत्री

सव्वासहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर

Update: 2022-03-08 12:11 GMT

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट मांडण्यासाठी तीन दिवस शिल्लक असताना विधानसभेत ६ हजार २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीला वेग देण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करु असं आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरवणी मागण्यां वरील चर्चेच्या उत्तरात सांगितले.

पुरवणी मागण्यांमधे सरकारने शेतकऱ्यांच्या वीज सवलतीसाठी ४९० कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच सारथी संस्थेसाठी १०६ तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १०० तर महाज्योतीसाठी १५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

२०२१-२२ या वर्षातील ६ हजार २५० कोटी ३६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होऊन त्या मंजूर केल्या. पुरवणी मागणीतील २ हजार ६९९ कोटींच्या मागण्या या भांडवली खर्चाच्या आहेत. तर ३ हजार ४९० कोटींच्या मागण्या महसुली खर्चाच्या आहेत.

यंत्रमागधारक तसेच कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीज सवलतीसाठी महावितरण कंपनीला १ हजार, ४७७ कोटी रुपयांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भ आणि महिला कंपनीस ४०० कोटी अनुदान स्वरूपात आर्थिक तरतुदीची तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी ४२ कोटी रुपयांची मागणी केली होती. अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विम्यासाठी राज्याच्या वाट्यापोटी ४५ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद आहे.

पुरवणा मागणीतील खातेनिहाय तरतूद

उद्योग, ऊर्जा, कामगार:2 हजार 848 कोटी रुपये

वित्त आणि नियोजन :1 हजार 763 कोटी रुपये

नगरविकास ;733 कोटी रुपये

महसूल आणि वने:181 कोटी रुपये

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग:164 कोटी रुपये

महिला आणि बालविकास:126 कोटी रुपये

सहकार आणि पणन:82 कोटी रुपये

कृषी :81 कोटी रुपये

जलसंपदा :75 कोटी रुपये

सामाजिक न्याय: 53 कोटी

2021-22 या वर्षातील पुरवणी मागण्या

जुलै:23 हजार 149 कोटी

डिसेंबर:31 हजार 298 कोटी


Full View

Tags:    

Similar News