अयोध्येत मशिदीसाठी जागा स्विकारण्याचा निर्णय

Update: 2020-02-24 11:47 GMT

अयोध्या शहरात मशीद बांधण्यासाठी राज्य सरकारने दिलेली जागा स्विकारण्याचा निर्णय़ सुन्नी वक्फ बोर्डाने घेतलाय. लखनौ इथ सुन्नी नक्फ बोर्डाची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी मशीदीसाठी जमिन स्विकारण्यावरुन सदस्यांमध्ये तिव्र मतभेद उत्पन्न झाले होते.

वक्फ बोर्डाची बैठक अडीच तास चालली. या बैठकीत बोर्डाच्या आठपैकी सहा सदस्यांनी भाग घेतला. तर दोन सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर अहमद फारुकी यांनी ही माहिती दिली.

हे ही वाचा..

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानूसार उत्तर प्रदेश सरकारनं वक्फ बोर्डाला पाच एकर जमिन उपलब्ध करुन दिली आहे. मशीद बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापन केली जाणार आहे. मशिदीसोबत इंडो इस्लामिक संस्कृती सेंटर तयार करणार आहे. शिवाय या जागेवर धर्मदाय हॉस्पिटल आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे.

अब्दुल रज्जाक आणि इमरान माबूद या दोन वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. मशिदीच्या मोबदल्यात दुसरं काही स्विकारण्याला शरियतमध्ये मान्यता नाही. अस म्हणत या सदस्यांनी बहिष्कार घातला.

Similar News