स्वप्नांना पंख देणारा जादुगार

Update: 2019-12-07 10:57 GMT

विमान आकाशात उडताना पाहून आपल्या मनात अनेक स्वप्न तरळतात. विमानात आपण कधी बसणार? हा प्रश्नही मनात येतोच. असंच काहीसा प्रश्न पारनेर येथील योगेश व्यवहारे या तरुणाच्या बालपणीच आला. मग मिळेल त्या ठिकाणाहून माहिती गोळा करण्यास त्याने सुरवात केली. शेतकरी कुटुंबात तेही ग्रामीण भागात जन्माला आलेल्या मुलाने असं काही स्वप्न बघावं हेही इतरांना हास्यास्पद वाटत होतं.

योगेशने याकडे लक्ष न देता कुटुंबाची साथ मिळवली व आपला प्रवास सुरु केला. पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. तर टुरिझम आणि एअरपोर्ट मॅनेजमेन्टचा कोर्स करून प्रसिद्ध टूर कंपनी मध्ये टूर मॅनेजर ची नोकरी मिळवली. नंतर विमान तिकीट बुकिंग एक्सक्यूटीव्ह तसंच मोठ्या IT कंपनी मध्ये ऍडमिन ची नोकरी मिळवली. परंतू मन एवढ्यावरच थांबलं नाही. चांगल्या पगाराची नोकरी चालत असतानाही आपण ग्रामीण भागातील मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावायला हवा.

या एका विचाराने योगेश, विश्वजित खोडदे आणि विनोद धुमाळ या तीन मित्रांनी मिळून SPYC Hospitality या कंपनीची स्थापना केली आणि याच कंपनी मार्फत त्यांनी पुणे या ठिकाणी CCTIPUNE ही प्रशिक्षण संस्था सुरु केली. पायलेटचेच नाही तर विमानात, विमानतळावर, एरलाईन्स किंवा टूर्स मध्ये, आवश्यक असलेल्या सर्विसेस कशा पद्धतीने प्रवाशांना देतात. या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण CCTI मध्ये दिले जाते, यात एअर होस्टेस ट्रेनिंग, एअरलाईन मॅनेजमेण्ट, एअरपोर्ट मॅनेजमेण्ट, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, एयरलाईन्स टिकेटिंग, टुरिझम मॅनेजमेण्ट, या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत.

ज्यामुळे विमानतळावर अावश्यक असलेल्या विभागात, एयरलाईन्स, टूर्स कंपनी आणि मल्टीनॅशनल कंपनी मध्येही नोकरी मिळु शकते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टीचा तयारी ते करुन घेतात. आपली स्वप्न पुर्ण होऊन न थांबता इतर तरुणाच्या स्वप्नासाठी काम करणारा तरुण योगेश व्यवहारे यांना जादुगारच म्हणावा लागेल.

Full View

Similar News