संघर्ष: दोन वर्षाचा चिमुकला जेव्हा कोरोनाशी दोन हात करतो...

Update: 2020-06-22 19:55 GMT

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली असून, चिमुकल्याला आज टाळयांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करीत मोठ्या उत्साहात घरी सोडण्यात आले.

परदेशातून कुटुंबासह पंढरपुरात आलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला तात्काळ वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर येथे दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. उपचारानंतर बालकाचे सर्व तपासणी अहवाल व चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर कोविड उपचार पथकाने आज पुर्णपणे बरा झाल्यानंतर बालकाला निरोप दिला.

या लहानग्याला वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे निरोप देण्यासाठी तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, डॉ.वृषाली पाटील, डॉ.पल्लवी पाटील , डॉ.भाऊसाहेब जानकर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Similar News