देशातील बँकाची स्थिती दयनिय रघुराम राजन यांच वक्तव्य

Update: 2019-11-01 05:09 GMT

देशातील बँकाची परिस्थिती वाईट असल्याच मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलयं. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रघुराम राजन यांच्यावर आरोप करत त्यांच्या कार्यकाळापासुनच देशातील सार्वजनिक बँकाची स्थिती वाईट आहे. यावर रघुराम राजन यांनी उत्तर देत, कॉँग्रेसच्या कार्यकाळात मी ८ महीने आरबीआयच्या गव्हर्नर पदी होतो, आणि भाजपाच्या काळात २६ महीने गव्हर्नर म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे मी गव्हर्नर पदी कार्यरत असतांना सर्वाधीक कालावधीत भाजपची सत्ता होती. असं सांगत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्यावर पटलावर केलाय.

बुडीत कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या बँकाना बाहेर काढण्याचे काम मी आरबीआयच्या गव्हर्नर पदी होतो, तेव्हाचं सुरु केलं होत. भारताला अर्थव्यवस्थेत सुधारण करायची असेल भारताला नव्या स्वरुपाच्या आर्थिक सुधारणा करणं आवश्यक असल्याचे देखील रघुराम राजन यांनी सांगितले आहे.

Similar News