अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव ; राज्य महिला आयोगाने मागवला अहवाल

Update: 2021-11-19 05:55 GMT

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागास लागलेल्या दुर्दैवी आगीमध्ये 12 निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला होता , याप्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागास लागलेल्या दुर्दैवी आगीमध्ये 12 निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला.याबाबतीत राज्य सरकार संवेदनशील आहे. घटनेची चौकशी करताना असे समजले की, शल्य चिकित्सक,वैद्यकीय अधिकारी,तीन नर्स व एक वॉर्ड बॉय यांचं निलंबन करण्यात आले. परंतु या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी असलेल्या विशाखा शिंदे या अस्थिरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थिनी असून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी विशाखा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणते निकष लावण्यात आले तसेच संबंधित विभागातील रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती का ? किंवा रुग्णालय प्रशासनाने तसे आदेश दिले होते का ?याबाबतीतचा सद्यस्थिती दर्शक अहवाल राज्य महिला आयोगाने मागवला आहे. अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

दरम्यान ,पोलिसांनी अतिशय घाईघाईने कारवाई केल्याचा आरोप परिचारिका संघटना तसेच IMA ने केला आहे. दरम्यान अटकेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी झाली.

Tags:    

Similar News