एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर फेकल्या चपला, राजकीय नेते काय म्हणाले?

Update: 2022-04-08 14:08 GMT

उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या निकालानंतर पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Worker Strike) मिटण्याची शक्यता होती. मात्र अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्या निवासस्थानी दाखल होत चपला फेकल्याच्या घटनेबद्दल राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भुमिका मांडली आहे. (ST worker agitation on silver oak)

राज्यात पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तोडगा निघण्याची शक्यता होती. मात्र अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एकत्र येत चपला फेकल्या. या प्रकरणावर राज्यभरातील नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आपली भुमिका मांडली आहे. (Dilip wales patil Comment on ST Worker agitation on silver oak)

घरावर हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रीया देतांना शरद पवार म्हणाले की, नेता चांगला नसेल तर त्याचा कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे मी एसटी कामगारांच्या पाठीशी आहे. परंतू चुकीच्या नेत्यांच्या पाठीशी नाही, असे सांगितले.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर चपला फेकल्यानंतर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक अनिष्ठ वळण लागले ते अनुचित आहे. तसेच पुढे त्यांनी लिहीले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवणारे कोण हे सर्वश्रुत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडीने कायम चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे. तसेच संविधानिक मार्गाने आणि चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलनाला अनिष्ठ वळण देऊ नये, असेही यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar comment on ST worker Agitation)

एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर चपला फेकल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्याबरोबरच एसटीच्या विलिनीकरणाचे आश्वासन एसटी कामगारांच्या अधिवेशनात शरद पवार यांनी दिले होते. मग आता विलिनीकरण नाही तर किमान सातव्या वेतना आयोगासदृश्य लाभ तरी द्यायला हवे होते, असे मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावर व्यक्त होताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे लोकशाही व्यवस्था मानणारे नेते आहेत. त्यांच्या घराबाहेर अशा प्रकारचे आंदोलन होणे हे चुकीचे आहे. आजच्या आंदोलनाचे वर्तन कोणत्याही लोकशाही व्यवस्थेतील आंदोलनाला शोभणारे नाही. या आंदोलनाच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या नेत्यांचे संस्कार काय आहेत ते एकदा तपासावे लागेल, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News