Maratha Arakshan : राज्य विधीमंडळाचं आज मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन

गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणा संदर्भात आक्रमक झाले. आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.;

Update: 2024-02-20 03:02 GMT

मराठा आरक्षणसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकार मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि मागासलेपणा संदर्भात विधेयक आज अधिवेशनात मांडलं जाणार आहे. तसेच याचं कायद्यात रूपांतर केलं जाऊ शकतो. आज होणाऱ्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील विधेयकाचा उल्लेख आहे.

समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन होणार आहे. इतर कुणाचंही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

"सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक, २०२४", असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे.

विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिकेत सांगण्यात आहे की, हे विशेष अधिवेशन आज ( २०/०२/२०२४ ) आज सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यानंतर राज्यपाल अभिभाषण करतील. यानंतर गटनेत्यांचे भाषण होईल आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

माहितीनुसार, मंगळवारी विशेष अधिवेशनात आधी मराठा आरक्षणासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतर विधान परिषदेत ते विधेयक प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या तीन अवस्थांमधून जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Tags: