राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रिमंडळाची चिंता वाढली

Update: 2020-06-12 01:53 GMT

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली असताना राज सरकारच्या चिंतेत भर पडली आहे, कारण मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे मुंडे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना देखील बाधा झाली होती. पण हे दोघे यातून बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

हे ही वाचा...

आनंदाची बातमी: ‘हा’ पूर्ण जिल्हा झाला कोरोना मुक्त, जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही…

टाळेबंदीचा अतिरेक नको!

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

5 जूनला परळीतील एक महिला औरंगाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. याच महिलेच्या कुटुंबियांच्या संपर्कात धनंजय मुंडे देखील आले होते..मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता..त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते.

तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वब निगेटिव्ह आढळून आले होते..त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते.. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही..परंतु या प्रयोगशाळेच्या उदघाटनाला अनेकजण उपस्थित होते..या वृत्ताला बीडच्या आरोग्य प्रशासनाकडून दुजोरा मिळत नसला तरी मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. काहींनी फेसबुक, व्हाट्स अप स्टेटस ठेऊन साहेब तुम्ही लवकर बरे व्हा असे प्रार्थनावजा मजकूर लिहिले आहेत. धनंजय मुंडे सध्या मुंबईत आहेत..

Similar News