मनोहर लाल खट्टर यांनी माफी मागावी, आंदोलक शेतकऱ्यांची मागणी

Update: 2021-10-04 15:05 GMT

एकीकडे उ. प्रदेशमधील लखमीपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. त्यात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. खट्टर यांच्यावर देशभरातून जोरदार टीका होते आहे. आपल्या भागातील पाचशे-हजार शेतकऱ्यांचा गट तयार करुन त्यांना स्वयंसेवक बनवा आणि काठ्यांनी जशास तसे उत्तर द्या, जास्तीत जास्त एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने तुम्हाला तुरुंगवास होईल, पण तुम्ही मोठे नेते बनाल, तुमचे नाव इतिहासात नोंदवले जाईल, असे यांनी म्हटले आहे.

मनोहर लाल खट्टर यांच्या या वक्तव्यावर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने मोठा संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर खट्टर यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी देखील केली आहे. तर काँग्रेसने मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. खट्टरजी तुम्ही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करायला सांगितले, शेतकऱ्यांवर हल्ला करुन तुरुंगात जा आणि नेते बना हा तुमचा गुरुमंत्र कदापीही यशस्वी होणार नाही. घटनेची शपथ घेऊन उघडपणे अराजकता पसरवणं हा देशद्रोह आहे, मोदी, नड्डा हे तुमच्या वक्तव्याचे समर्थन करतील पण असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News