रेशीम उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित ; तुतीचे रोप घेऊन शेतकरी रस्त्यावर

Update: 2021-11-10 12:15 GMT

बीड : बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे रखडलेले अनुदान तात्काळ अदा करण्यात यावं, या मागणीसाठी रेशीम उत्पादक शेतकरी तुती घेऊन रस्त्यावर उतरला आहे.

यावेळी जिल्हा रेशीम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. यावेळी तुतीचे रोपं हातात घेऊन शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करून कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कार्यारंभ आदेश न दिल्यास तुती सुकून जाईल परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल असं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचं देखील यावेळी शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

Tags:    

Similar News