धक्कादायक! नौदलात कोरोना व्हायरसचा शिरकाव, मुंबईत २० नौसैनिकांना लागण

Update: 2020-04-18 03:10 GMT

सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोना व्हायरस ने आता भारतीय नौदलात शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलातील 20 सैनिकांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

या सर्व सैनिकांना मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये करण्यात आले आहे. करोनाची लागण झालेल्या नौसैनिकांची INHS अश्विनीमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे नौदलाचे मुंबईतील रुग्णालय आहे.

नौदलाच्या मुंबईतील हॉस्पिटलमध्येच या नौसैनिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नौदलात कोरोनाचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे. मुंबईतील सागरी किनाऱ्यावर नौदलाचा INS आंग्रे हा तळ आहे. या तळावरच नौसैनिकांची राहण्याची सोय आहे. INS आंग्रेवरुन पश्चिम नौदल कमांडच्या विविध कामांसाठी प्रशासकीय आणि लॉजिस्टिकल मदत पुरवली जाते.

दरम्यान या सैनिकांना कोरोना ची कशी लागण झाली? याचा कसून तपास केला जात असून आत्तापर्यंत मुंबईतील इतर अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का? हे स्पष्ट झालेलं नाही.

देश-भरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता १४ हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. तर आतापर्यंत देशात ४५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Similar News