राहुल शेवाळे यांचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत

Update: 2022-07-30 10:30 GMT

लोकसभेत शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे हे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर राहुल शेवाळे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राहुल शेवाळे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल शेवाळे हे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई विमानतळावरील भव्य स्वागतानंतर राहुल शेवाळे यांनी प्रभादेवी येथे जाऊन सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यानंतर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन त्यांनी आदरांजली वाहिली.

मुंबईला निघण्याआधी राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये धारावी पुर्विकास प्रकल्पाविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या भेटीमध्येच प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रेल्वेची सुमारे 45 एकर जागा एका महिन्यात राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 

Tags:    

Similar News