शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ह*त्या

ठाणे ( Thane ) हा मुख्यमंत्री ( Chief Minister ) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असला तरी इथे आता हत्येसारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडू लागले आहे. शिवसेनेचे ( Shiv Sena ) उपविभागप्रमुख रवी परदेशी ( Ravi Pardeshi ) यांच्यावर रविवारी जांभळी नाका येथे धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेरीवाल्याच्या जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Update: 2023-03-01 10:00 GMT

ठाण्यातील ( Thane ) जांभळीनाका ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी ( Ravi Pardeshi ) यांचा व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्यांचे दुकानाच्या कारणावरुन दोन फेरीवाल्यांसोबत ( hawker ) वाद झाले होते. रविवारी रवी परदेशी रात्रीच्या १० च्या सुमारास घरी जात असताना २ ते ३ अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्य़ात आला असून, पोलिसांकडून गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, ठाण्यात ( Thane ) फेरीवाल्यांच्या ( hawker ) वादातून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे आपण पाहिले आहेत. आता रवी परदेशी यांच्या हत्येनंतर फेरीवाल्यांचा ( hawker ) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   

Tags:    

Similar News