जिस स्कूल में पढ़ते हो, वहां के हम हेडमास्टर - संजय राऊत

Update: 2019-12-11 12:37 GMT

दुसऱ्या देशातील व्यक्तीला भारताचं नागरिकत्व देण्यासाठी असणाऱ्या कायद्यात बदल करण्याच्या विधेयकाला लोकसभेनं मंजूरी दिली आहे. त्यानंतर आज हे सुधारणा विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलं. त्यावर आज राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांनी आपलं मत राज्यसभेत व्यक्त केलं. संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

लोकशाहीत वेगवेगळे मतप्रवाह असतात. मी काल पासून पाहात आहे. काल पासून असं म्हटलं जात आहे. की, जे या विधेयकाला समर्थन देत नाहीत. ते देशद्रोही आहेत. आज मी पेपर वाचले. त्यामध्ये एक बातमी पाहीली. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहे. असं म्हटलं होतं. देशातील जनतेने मतदान केले आहे. ही पाकिस्तानची संसद नाही. असं राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं न नाव घेता मोदी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

देशभक्तीचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही

देश भक्तीचं प्रमाणपत्र देण्याची आम्हाला गरज नाही. जिस स्कूल में आप पढते हो, हम उस स्कूल के हेडमास्टर हैं.

जिस स्कूल में आप पढते हो, हम उस स्कूल के हेडमास्टर हैं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुणी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आमचे हेडमास्टर असल्याचंही यावेळी राऊत यांनी सभागृहात सांगितलं.

Similar News