50 कोटी नाईट लाईफ, ब्रॅण्डेड शर्ट्सवर उधळू नका ; म्हात्रेंचा उबाठा गटाला टोला

Update: 2023-08-05 03:48 GMT

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.यावेळी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. यावर शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या की " शिवसेना पक्ष आमचा, म्हणजे पक्षाकडे असलेला निधी सुद्धा खरं तर आमचाच. पण, शिवसैनिकांच्या पन्नास कोटींच्या लोण्यावर नजर लावून बसलेले बोके आम्ही आज पाहिले. आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती नकोय. आम्ही विचारांचे वारसदार असल्याची टीका म्हात्रे यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की "त्यांनी पक्षाच्या बॅंक खात्यातले ५० खोके लेखी पत्राव्दारे मागितले आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एकदम ओक्के’ म्हणून ते पैसे दुसऱ्या मिनिटाला देऊन टाकले. सत्ता आणि पैशासाठी तुम्ही किती हपापले आहात ते आज सिद्ध झालंय असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. आता हे पन्नास कोटी नाईट लाईफ आणि ब्रॅण्डेड शर्ट्सवर उधळू नका. लोकांच्या भल्यासाठी वापरा. ओक्के ? असं म्हणत उबाठा गटाला टोमणा ही मारला आहे.

Tags:    

Similar News